top of page

🙏 जय गिरनारी 🙏 यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्वांना खालील सूचनांचे पालन करावे ही विनंती..

गिरनार परिक्रमा सोमनाथ यात्रा


२३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३


यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्वांना खालील सूचनांचे पालन करावे ही विनंती..


यात्रेची रूपरेषा :-


२३/११/२०२३ दिवस पहिला :-

वांद्रे टर्मिनल (मुंबई) येथून दुपारी १२:०० वाजता चंदिगढ एक्स्प्रेसने अहमदाबाद साठी प्रयाण , अहमदाबाद येथून रात्री १०:१० वाजता सोमनाथ सुपरफास्ट एक्स्प्रेसने जुनागढ साठी प्रयाण


1. सर्वांनी बांद्रा टर्मिनस येथे सकाळी 11 वाजता पोचावे,( ट्रेन सुटण्या आधी 1 तास) कृपया उशीर करू नये, सर्वांचे तिकीट, आसन क्रमांक वैगरे लिखित स्वरूपात टाकण्यात येईल.


2. यात्रेत / प्रवासात जातांना प्रत्यकाने आपले दुपारचे / रात्रीचे जेवण घेऊन यावे. परतीच्या प्रवासात जेवणाची व्यवस्था करण्यात येईल


२४/११/२०२३ दिवस दुसरा :-


पहाटे ४:१० वाजता जुनागढ येथे आगमन. हॉटेलमध्ये विश्रांती.चहा, नाष्टा व दुपारच्या भोजनानंतर गिरनार परिक्रमा साठी प्रयाण


3. जंगल परिक्रमा आहे आणि पूर्ण एक रात्रं जंगलातून चालावे लागणार म्हणून वॉकिंग शूज कृपया घालून येऊ नका साधे बूट किंवा सँडल घालाव्या. ज्यांना गुडघ्याच्या त्रास असेल त्यानी knee cap सोबत ठेवा.


4. दुपारच्या भोजनानंतर गिरनार परिक्रमा साठी निघतांना एक छोटी बॅग / sack मध्ये खालील वस्तू घ्या..

आपली रोज लागणारी औषधे, चॉकलेट- गोळ्या आपली पाण्याची बाटली छोटा टॉर्च, बिस्किटे, थोडा सुका खाऊ,बसण्यासाठी पातळ सतरंजी किंवा बेडशीट,ह्या वस्तू जवळ ठेवा,आधार कार्ड न विसरता घेऊन यावे.


२५/११/२०२३ दिवस तिसरा :-


5. गिरनार परिक्रमा समाप्तीनंतर हॉटेलमध्ये विश्रांती.


२६/११/२०२३ दिवस चौथा:-


6. सोमनाथ दर्शन


२७/११/२०२३ दिवस पाचवा :-


7. रोप-वे मधून जाणाऱ्या भाविकांसाठी दत्त शिखर गिरनारसाठी प्रयाण आणि जे पायी जाणार असतील त्यांनी पहाटे 0230 निघावे लागेल (एकूण 9999 पायर्‍या आहेत़)

8. सर्व भाविकांसाठी दर्शनानंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये विश्रांती, रात्रीचे भोजन.


२८/११/२०२३ दिवस सहवा :-


9. शेरणाथ बापू, काश्मिरी बापू समाधी ,इतर दर्शन


२९/११/२०२३ दिवस सातवा :-


10. सकाळी ११:२३ वाजता जुनागढ येथून जबलपूर एक्स्प्रेसने अहमदाबाद साठी प्रस्थान.

11. रात्री १०:५० वाजता अहमदाबाद येथून गुजरात मैलने दादर साठी प्रस्थान.


३०/११/२०२३ दिवस आठवा :-


12. पहाटे ६:१५ वाजता दादर येथे आगमन.



विशेष सुचना :


1. प्रतेकाने आपला 1 alternate फोन नंबर ग्रुप वर न विसरता देऊन ठेवा, जंगल प्रारिक्रमेत यात्रेकरूंना आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर जायचे आहे आयोजक सर्वांबरोबर 1काच वेळी असू शकणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी व प्रत्येकाने आपली आणि आपल्या बरोबर असणाऱ्या सह प्रवाशाची कृपया काळजी घ्यावी.


2. यात्रेत येताना महाराजांना अर्पण करण्यासाठी-कापूर, प्रसाद ( शक्यतो घरूनच ), अष्टगंध, अत्तर, धूप-अगरबत्ती, आणावे.


गिरनार यात्रा व गिरनार परिक्रमे बाबत घायवायची काळजी:


१) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.


२) चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट घ्यावा (sports sandal उत्तम ) आणि त्यावर १०-१५ दिवस चालण्याचा सराव करावा.


३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.


४) साधारण रात्री ११ वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते. अंदाजे ५ तास लागतात.


५) कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी. ६) स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी साधारण ६००० पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो.


६) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३० रुपये दर त्यातील २० रुपये परत मिळतात).


७) पाण्याची बाटली घ्यावी, रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पाहिले ३००० पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते.


८) खिशामध्ये खडीसाखर, गोड गोळ्या घेणे.


९) कमरेला pouch असेल तर उत्तम.


१०) सुरवाती पासून वर पादुका पर्यंत कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे.


११) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो.


१२) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो ६/८ ग्रुपमध्ये जावे). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.


१३) प्रत्येकाने बॅटरी जरूर बरोबर घ्यावी, २ जादा सेल बरोबर असावेत. वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे.


१४) आपल्यापेक्षा बरेच शारीरिक दृष्ट्या दुर्बळ व वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी, विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा. वेगळी अंतरिकशक्ती मिळते.


१५) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने चालण्याचा उत्साह अधिक वाढतो. बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी, आपला उत्साह वाढतो व श्रम परिहार होतो.


१७) उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते.


१६) जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावे त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली. त्यावर २, ३ मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो.


१७) त्रिपुरी पोर्णिमेच्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता मोकळा करते. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे. दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा.


१८) काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा. लोकं काय म्हणतील/बरोबर चे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते. अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात. डोलीचा खर्च आपले आपण करायचा असतो. येथे सरकार नियुक्त दरपत्रक आहे. सधारणतह माणसाचे वजनानुसार हा आकार असतो.


१९) गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही, पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार, फुले मिळत नाही. कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता आपल्या सॅकमध्ये मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात.


२०) शेवटचे व अत्यंत महत्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप ताकद व उत्साह देतो, कारण तुम्हाला परत साधारण २००० पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अदबीने वागावे. विनाकारण हुज्जत अथवा भांडण करू नये. जमल्यास ऐपतीनुसार तेथे दानधर्म करावा. त्यांना हि सेवा वर्षभर व वर्षानुवर्षे चालवायची आहे हे एक कठीण व्रत आहे. पण सेवाभावाने साधू व भक्तगण ते करीत आहेत.


श्री गुरुदेव दत्त🙏🙏



21 views1 comment
bottom of page